पारनेर प्रतिनिधी. भानुदास आग्रे.
नांदूर पठार गावचे मा.सरपंच अर्जुनशेठ देशमाने यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने शुक्रवारी रात्री दिनांक२६/१२/२०२५ निधन झाले. अर्जुन शेठ देशमाने यांच्या निधनानं नांदूर पठार गावच मोठ नुकसान झालं , ही पोकळी कधीच भरून निघणार नाही असे मत मा.सरपंच आणि भावी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र शेठ राजदेव यांनी व्यक्त केले.
राजदेव पुढे म्हणाले की ,त्यांच्या कार्यकाळात पाणी आडवा आणि पाणी जिरवा ह्या माध्यमातून पाणी फाऊंडेशन चळवळीत गावाने भाग घेतला आणि तालुक्यात पहिल्या नंबर चे बक्षीस दहा लाख रुपयांचे बक्षीस गावाला मिळण्यास अर्जुनशेठ यांचाच सिंहाचा वाटा होता ,प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी हिरहिरेने भाग घेणारे अर्जुनशेठ देशमाने आपल्याला सोडून गेले ते परत आपल्याला दिसणार नाही परंतु त्यांच्या कार्यकाळात जे काम झाले ते नेहमी कायम स्वरुपी नांदूर पठारच्या इतिहासात नोंद होईल .
गेल्या दोन वर्षात राजेंद्र चौधरी ,कानीफशेठ आहेर आणि आता अर्जुनशेठ देशमाने ही मंडळी गेल्यामुळे पोकळी निर्माण झाली ,
अंत्यविधीच्या वेळी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके साहेब ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती बापू शिर्के ,नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के सर , मा.पंचायत समिती सदस्य शशिकांत आंधळे , श्री रंगदास स्वामी देवस्थान आणे अध्यक्ष मधुकर दाते , बाळासाहेब दाते ,रंगनाथ आहेर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजीशेठ बेलकर , डॉ दीपक आहेर, श्री खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अशोक घुले ,बाळासाहेब गगे, जालिंदर महाराज वाबळे ,प्रकाश गाजरे ,संदीप चौधरी , उप सरपंच सुनील राजदेव. अमोल उगले ,पोपट चिकणे ,दिनेश शेठ घोलप, अरुण आग्रे, असे अनेक गावचे आजी माजी सरपंच आदी उपस्थित होते .
अंत्यविधीच्या वेळी प्रचंड जनसमुदाय ,मुंबईकर ,पुणेकर ,आप्तेष्ट उपस्थित राहून देशमाने परिवाराच्या दुःखात सहभागी झाला .





Social Plugin