भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड - गंगापूर शहरातील थरारक घटना संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात उमरेड शहरातील गंगापूर परिसरात घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेनं संपूर्ण खडबड उडाली आहे. ३५ वर्षीय महिलेसह ८० वर्षीय महिलेची निर्घुण हत्या झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आलेले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक,धन्यायची झडप आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार खूण नालीतील एका दांड्याने करण्यात आलेला असून तो दांडा रक्ताने भरलेला असून तो दांडा रक्ताने माखलेल्या अवस्थेत घटनास्थळी सापडला आहे.दरम्यान परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.पोलिसांकडून संशयितांकडील चौकशी पूर्ण झाल्यावर अधिकृत माहिती आणि सविस्तर माहिती जाहीर केली जाणार असल्याचे समजते. या प्रकरणी सविस्तर वृत्त,आरोपीची ओळख खूण केल्या मागची कारणे आणि पोलिस चौकशीतून लवकरच समोर येईल असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला आहे.
दिनांक - २७/१२/२०२५





Social Plugin