विलासभाऊ राठोड स. अध्यक्ष विदर्भ क्षेत्रीय समिती/अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद
.गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
‘हिंद-दी-चादर’ म्हणून अखंड भारतीय इतिहासात अढळ स्थान असलेले नववे शीख धर्म गुरु श्री गुरु तेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या स्मरणार्थ दिनांक ७ डिसेंबर, २०२५ रोजी नागपूर येथे भव्य महासत्संग संपन्न झाला. हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता धर्म, संस्कृती, त्याग आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा ठरला. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग, धर्मजागरण समितीने उभारलेले राज्यव्यापी नेटवर्क, प्रमुख सात समाजाचे प्रतिनिधी, धर्मगुरू, साधुसंत, महंत, समाज बांधव, महाराष्ट्र शासनाच्या हिंद दि चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वरभाऊ नाईक यांच्या नेतृत्वात सर्व राज्य समिती सदस्य यांचे प्रभावी नियोजन, समन्वय आणि विविध संघटने मुळे हा कार्यक्रम अगदी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विभाग, धर्मजागरण विभागाची मेहनत, सातत्य व संघटनकौशल्य या कार्यक्रमातून ठळकपणे दिसून आले; संकल्पना, अंमलबजावणी आणि समन्वय या तिन्ही स्तरांवरील कार्य विशेष उल्लेखनीय ठरले.
या कार्यक्रमाची भूमिका, नियोजन आणि यशामागे राष्ट्रीय धर्मजागरण विभागाचे प्रमुख मा. श्री. शरदरावजी ढोले, मा. श्री. महेंद्रजी रायचुरा, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वरभाऊ नाईक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. सातत्याने घेतलेल्या नियोजनबद्ध बैठका, लंगर सेवा, प्रदर्शनी, बॅनर, पोस्टर्स, बोर्ड्स, गुरुनानक देव गुरुदेव बहादुर साहेब व श्री संत सेवालाल महाराजांचे मोमेंटो यांसारख्या प्रत्येक बाबीवर रामेश्वरभाऊ नाईक यांनी बारकाईने लक्ष ठेवले. काही बाबींवर निर्माण झालेल्या सामाजिक भावना संवेदनशीलतेने हाताळण्यात आल्या. या अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या अविस्मरणीय कार्यक्रमात जे भाविक भक्त सहभागी झाले. त्यांच्या प्रतिक्रिया उच्च कोटीच्या होत्या. सर्व भाविकांनी नागपूर येथील उत्कृष्ट, आयोजन, नियोजन समन्वय पाहून धन्य झाले व समाधान व्यक्त केले.
मुख्य सत्रात मान्यवरांच्या भाषणांनी कार्यक्रमाला वैचारिक दिशा दिली. सर्वप्रथम मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबोधित केले. त्यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिब, बाबा लखीशाह बंजारा, मक्खनशाह लभाणा यांच्या त्यागाचा इतिहास मांडत, गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी जबरदस्तीच्या धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर दिलेली शहीदी दुर्मिळ असल्याचे स्पष्ट केले. हा इतिहास शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
या कार्यक्रमामागे रामेश्वरभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रम घेणारी राज्यस्तरीय व विदर्भ क्षेत्रीय टीम कार्यरत होती. गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज, दमदमी टक सालचे संत हरनाम सिंगजी, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, लमान समाजाचे धर्मगुरू रामसिंग महाराज, सुरेश महाराज, शिकलीगर समाजातील तेजासिंग बावरी, हॅपी सिंग, गुरमीत सिंग खोकर, सुखविंदर सिंग, सोनू महाराज, तसेच इतर सर्व मान्यवर, समाजबांधव यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले. त्याचबरोबर विविध समाजांमध्ये समन्वय निर्माण करणारे समाजनेते, राज्य समितीचे सदस्य, धर्मरक्षक किसनभाऊ राठोड यांनी या समागमाला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमस्थळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मुख्य भाषण विशेष लक्षवेधी ठरले. भारतीय इतिहासातील विविध उदाहरणे व संदर्भ देत त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषण प्रत्येक समाजमनाला स्पर्श करून गेले. आपल्या समाजाचा इतिहास मुख्यमंत्री महोदयांच्या मुखातून ऐकण्याचा अनुभव उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी होता. त्यांच्या भाषणातून श्री. रामेश्वरभाऊ नाईक यांचे केलेले कौतुक आणि दिलेली शाब्बासकी अनेकांना प्रेरणा देऊन गेली.
या ऐतिहासिक शहीदी समागमाला देशभरातून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले. केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी, जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीशजी महाजन, राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, अखिल भारतीय धर्मजागरण समितीचे प्रमुख मा. श्री. शरदरावजी ढोले, राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ, आमदार मा. श्री. कृष्णा खोपडे, आमदार सई डहाके, विदर्भ प्रांत आयोजन समितीचे अध्यक्ष सरदार गुरमित सिंग खोकर, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विदर्भ क्षेत्रीय स. अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या समागमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दमदमी टकसालचे संत हरनाम सिंगजी यांचे विचारपूर्वक आणि समाजाला दिशा देणारे भाषणही महत्त्वाचे ठरले. विविध साधु संतांची कीर्तने, प्रवचने, गुरूबानी, गायन करणारे कीर्तनकार आणि शीख रागींच्या आध्यात्मिक कथांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मोठी गर्दी, अखंड सुरू असलेली लंगर सेवा आणि सर्वत्र दिसणारा आनंद—जणू काही प्रत्यक्ष श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचे तेजस्वी रूपच त्या स्थळी अवतरले होते, असा अनुभव उपस्थितांना आला.
या ऐतिहासिक समागमाच्या यशात महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विभाग, अ. भा. धर्मजागरण समिती, शीख, बंजारा , लभाणा, सिकलीगर, मोहियाल, सिंधी तसेच वाल्मिकी समाज, सर्व प्रमुख सात समाजाचे प्रतिनिधी, धर्मगुरू, साधुसंत, समाजबांधव आदींचे आत्मीय सहकार्य लाभले.
यात विशेषतः मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख श्री. रामेश्वरभाऊ नाईक व त्यांची टीम, डॉ. जगदीश सकवान साहेब तसेच निलेशजी जाधव साहेब, रवींद्र राठोड साहेब, सुधाकरजी राठोड, नारायणजी चव्हाण, संतोषजी कोकाटे आदी सर्वांचे सहकार्य उल्लेखनीय होते.
दिवसभराच्या कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन, गुरूबानी गायन, धार्मिक विधी, महा सत्संग, लंगर सेवा, रक्तदान शिबिरे आणि प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या समागमातून शीख समाजासह गोर बंजारा–लभाणा, सिकलीगर, मोहियाल, सिंधी आणि वाल्मीकी समाज यांच्यातील सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला.
एकंदरित नागपूर येथे संपन्न झालेला ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम हा श्रद्धा, शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य संगम ठरला. उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि समर्पित परिश्रम यांच्या बळावरच इतिहासात अढळ स्थान मिळवणारे असे कार्यक्रम घडतात—आणि नागपूरातील हा समागम त्याचे जिवंत उदाहरण ठरला.





Social Plugin