Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकाराच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे तक्रार दाखल, परिसरात निर्माण झाली खळबळ



पातूर तालुका प्रतिनिधी 

पत्रकारितेच्या नावाखाली सामाजिक सौदार्य पायदळी तुडवीत शासकीय कर्मचारी आणि राजकीय पदाधिकारी यांना वेठीस धरून आपले उखळ पांढरे करणाऱ्या एका पत्रकाराच्या विरोधात पिंपळखुटा येथील सरपंच सौ. अलकाताई वाहोकार यांनी यांनी 16/12/2025 रोजी थेट जिल्हा धिकारी आणि पोलीस अधीक्षक अकोला यांच्या कडे तक्रार दाखल केल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

खेट्री येथील शेख नासीर अहमद हे येथील एका शाळेवर लिपिक असून दैनिक जनमाध्यम आणि दैनिक पुण्य नगरीचे स्थानिक बातमीदार आहेत.पिंपळखुटा येथील युसुफ शाह नामक व्यक्तीच्या आत्मदहन आणि अतिक्रमन संदर्भात खोटी आणि दिशाभूल करणारी बातमी प्रकाशित केल्याबद्दल पिंपळखुटा ग्राम पंचायत च्या विद्यमान सरपंच सौ अलका वाहोकार यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अकोला येथे धाव घेत सदर बातमीदारावर कायदेशीर कारवाही करण्याची मागणी केली आहे.सरपंच सौ. अलकाताई सुभाष वाहोकार यांनी  आपल्या या तक्रारीत सदर पत्रकारावर विविध आरोप करीत कारवाईची मांगणी केली असून तक्रारीची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना देखील पाठविली आहे.