Ticker

6/recent/ticker-posts

बामणगुडा मध्ये बिबट्याचा थरार; हल्ल्यात महिला गंभीर जखमी



लक्की राठोड मांडवी नांदेड

काल 23 डिसेंबर दुपारी 2 वाजता माहूर तालुक्यातील मौजे बामणगुडा येथील लता सुरेश तोडसाम  वय 35 ही महिला शेतात कापूस वेचणी करत असताना दुपारी 2 वा. च्या सुमारास शेतलगतच्या जंगलातून बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्यात तिच्या गालावर, कपाळावर व मानेवर जबर जखम झाली..आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने पळ काढल्याने त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यावेळी तिच्या पतीने इतरांच्या मदतीने महिलेला सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले . डॉ. बी. एम. मोरे यांनी प्राथमिक उपचार करून तिला माहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले.