Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी यात्रेतील श्वान शर्यतीत वाईच्या सुयश वाडकर यांचा मटका २४ श्वान प्रथम क्रमांकाचा मानकरी

 


बुथ  दि  [प्रकाश राजेघाटगे]     

             श्री सेवगिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव ता खटाव येथे आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय श्वान शर्यतीत वाईच्या सुयश वाडकर  यांचा मटका २४ या श्वानाने अजिंक्यपद पटकावत हिंदकेसरी श्वानाचा किताबाची चांदीची गदा आणि ५१ हजार रोख , स्मृतिचिन्ह असे बक्षिस पटकावले . या श्वान शर्यतीमध्ये उपविजेता होण्याचा मान सिध्देश्वर रेसिंग क्लब , कुंभारी येथील शाईन नावाच्या श्वानाने मिळवून ३१ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह प्राप्त केले .

               शासकीय विद्यानिकेतन शेजारी सातारा दहिवडी रस्त्यालगत झालेल्या यास्पर्धेत सातारा सोलापूर,सांगली,या भागातील श्वानांनी सहभाग घेतला, रात्री उशिरापर्यंत

अत्यंत अटातट्टीच्या  लढती झाल्या .या स्पर्धेत अनुक्रमे विजयी श्वान व त्याचे मालक पुढीलप्रमाणे

1. सुयश वाडकर,वाई (वारसदार 24)

2. ⁠सिद्धेश्वर रेसिंग क्लब,कुंभारी (शाईन)

3. ⁠अमीरभैय्या शेख,मलकापूर (भुंगा 555)

4. ⁠गोल्डन ग्रुप,महाराष्ट्र (सेनोरिटा)

5. ⁠बिल्ला ग्रुप,महाराष्ट्र (हिरकणी)

6. ⁠बाळूमामा प्रसन्न,इस्लामपूर (रायबा)

7. ⁠पै.शंकर वलेकर,उंबरमळे (कृष्णराज)

8. ⁠रॉयल रेसिंग क्लब,आंबेगाव-विटा (रॉयल साक्षी)

9. ⁠सेवागिरी प्रसन्न,पुसेगांव (ज्यु. एनर्जी)

10. ⁠टायगर ग्रुप,महाराष्ट्र (कॉपीगर्ल 1001)

          सर्व विजेत्या  श्वान मालकांना सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प . पु. सुंदरगिरी महाराज,चेअरमन संतोष वाघ ,विश्वस्त डॉ सुरेश जाधव, रणधीर जाधव ,बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख व गौरव जाधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते बक्षीस  देण्यात आले.,

श्वान शर्यत यशस्वी करण्यासाठी कमीटीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

  पंच म्हणून पत्रकार संदीप जाधव, स्वाधीन जाधव (पुसेगाव ),अजिंक्य महाजन (,चितळी ).अनिकेत डूबल, (ओडोली )वैभव शेडगे, (पारगाव )सचिन शिंदे (मायणी )यांनी काम पाहिले.

 सौरभ बोंद्रे यांनी सुत्रसंचलन केले तर देवस्थान ट्रस्टचे सचिव विशाल माने यांनी आभार मानले.

 या श्वान शर्यतीमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील  १९३ श्वानांनी सहभाग नोंदविला होता. तसेच अकरा ते तीस क्रमांक आलेल्या श्वान मालकांना ही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.