Ticker

6/recent/ticker-posts

कै.नामदेव अशोक सोनवणे तरुणाचं अल्पशा आजाराने दुःखद निधन.

 


राजूर/पत्रकार प्रकाश परते.

   अकोले तालुक्यातील गुहीरे या गावातील नामदेव अशोक सोनावणे (22) यांचं अल्पशा आजारने दि.4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास दुःखद निधन झाल. त्यांच्या पश्च्यात आई वडील, भाऊ, बहिणी चुलते असा मोठा परिवार आहे.

     मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून पंचक्रोशीत 'नामाभाऊ' या नावाने त्याची चांगलीच ओळख होती.

 गुरुवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा मित्र परिवार व सकल आदिवासी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

 त्यांच्या जाण्याने संपूर्ण गुहीरे गावात तसेच सर्व मित्रपरिवार व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.