कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, जालना विभाग यांच्या वतीने समाज कल्याण कार्यालय, जालना येथे आयोजित बाल कला महोत्सव 2025–26 हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे हा होता. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी श्री. जोमा मस्ती सर होते, तर जालना तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. वाहूळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच चित्रपट अभिनेत्री श्रीमती वैशाली दाभाडे, इंग्रजी शिक्षक श्री. सुभाष सर , श्री. भूषण सर, श्री. सोनकांबळे सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण प्रसन्न झाले. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, नैतिक मूल्ये व करिअर मार्गदर्शन यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
महोत्सवात विद्यार्थ्यांनी गायन, एकल नृत्य, समूह नृत्य, नाटिका व शैक्षणिक सादरीकरण यामधून आपली कला सादर केली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सर्जनशीलता ठळकपणे दिसून आली.कार्यक्रमाच्या शेवटी श्री. जोमा मस्ती सर व श्रीमती वर्षा देशमुख (मुख्याध्यापिका, स्व. राजीव गांधी मूकबधिर शाळा, जालना) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये श्री. जगदीश सातपुते सर (APC), श्री. सुबोध खंडारे सर, श्री. कैलास कोल्हे (आनंदो केंद्र कार्यकारी), श्री. शिवाजी काजळकर सर, श्री. अमोल गोंडगे सर, श्री. आकाश राठोड सर, श्री. अमोल ठोकरें सर, श्री. समाधान गडदे सर, श्री. जितेंद्र खिलारे सर, श्रीमती सोनाली कोरडे मॅडम, श्री. नवनाथ कवळे सर व श्री. जनार्धन राठोड सर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप श्री. शिवाजी काजळकर सर यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला. बाल कला महोत्सव 2025–26 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व स्मरणीय ठरला.





Social Plugin