मंगेश पुंड @ग्रामीण प्रतिनिधी.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या संकल्पनेतून वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा 11 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता पार पडणार असून या मॅरेथॉन स्पर्धेला सेलिब्रिटींची हजेरी लागणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेला प्रमुख उपस्थिती तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील हार्दिक जोशी (राणादा) आणि अक्षया देवधर (अंजली बाई) हे उपस्थित राहणार आहेत. राजु भैय्या नवघरे हे कार्यसम्राट आमदार आहेत. आमदार राजु भैय्या नवघरे हे सतत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून जनतेला ऊर्जा देण्याचं काम करतात.
मॅरेथॉन स्पर्धेचे हे 3 रे वर्ष आहे. आमदार नवघरे हे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवतात. मागील महिन्यात नवोदय सराव परीक्षेचे आयोजन केले होते, नवोदय सराव परीक्षेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून 7000 विद्यार्थी उपस्थित होते. 'माझं वसमत- Healthy वसमत ॑
या आरोग्य,एकता आणि सकारात्मकतेचा संदेश आमदार राजुभैय्या नवघरे यांनी दिला आहे. माझ्या वसमत मतदारसंघातील जनतेचे आरोग्य Healthy राहावे ही राजु भैय्या नवघरे यांची इच्छा आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या प्रमाणात इच्छुकांना सहभागी होण्याचे आवाहन कार्यसम्राट आमदार राजुभैय्या नवघरे यांनी केले आहे.





Social Plugin