Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.यशवंत दत्तात्रय पवार राज्यस्तरीय दर्पण रत्न 2026.



पुरस्काराने सन्मानित 

डॉ.यशवंत पवार @7 जानेवारी 2026

कन्नड:- येथे वैद्यकीय  सांस्कृतिक  सामाजिक क्षेत्रात  सातत्याने कार्यरत जयकाली सांस्कृतिक मंडळ कन्नड चे अध्यक्ष तसेच दै.महाराष्ट्र ग्रामीण चे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी डॉ.यशवंत दत्तात्रय पवार यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न जीवनगौरव पुरस्कार 2026 ने गौरविण्यात आले.

   पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ६ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर जि.बुलढाणा येथे *राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026* हा भव्य सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर जि.बुलढाणा येथील मराठा मंगल  सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

    दर्पण रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे सहा. माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई  कार्यक्रमाचे उद्घाटक

डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) ,   तर प्रमुख पाहुणे  धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ,  सुभेदार दिनेश तायडे कारगिल योद्धा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

 डॉ.यशवंत पवार हे कन्नड शहरात गेली 40 वर्ष आरोग्य सेवा देत असतांनाच नाट्य चळवळ, सांस्कृतिक, साहित्य, क्रिडा ,पर्यावरण, लोकसंख्या नियंत्रण  ,एडस जनजागृती , व्यक्तिमत्व विकास, आदी क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. 

  समाजातील अंधश्रद्धा दुर व्हाव्या म्हणुन 30 वर्षापासून कार्यरत आहेत, 

 नाट्य चळवळीच्या माध्यमातून हजारो युवक-युवतींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

  तर हजार पेक्षा जास्त नाट्य प्रयोग सादर करत महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत कन्नडला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

 पत्रकारीता हा त्यांचा छंद असुन सामाजिक प्रश्नांना ते वाचा फोडत असतात, सध्या ते दै.महाराष्ट्र ग्रामीण आणी दै.शूर मराठा च्या माध्यमातून लेखण करत असतात.

 या सोबतच सध्या युवकांना संगणक प्रशिक्षण देत असुन

शेतकर्यांना  खर्च कमी करुन उत्पन्न वाढीसाठी सेंद्रिय शेती चा वापर कसा करावा या बाबत मार्गदर्शन करत आहेत. 

 आतापर्यंत त्यांना केंद्र शासनाचा नेहरु युवा पुरस्कार, लळीत युवा पुरस्कार , मराठवाडा रत्न पुरस्कार, समता रत्न पुरस्कार, अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

  या पुरस्काराबद्दल त्यांचे डॉ.सतिष वैष्णव ( छत्रपती संभाजीनगर), डॉ.रमेश सुर्यवंशी , प्रा.रंगनाथ लहाणे, राजेंद्र जगधणे (श्रीरामपूर) , श्याम दंडवते ( राहाता) विलास हासे ( संगमनेर) अशोक पवार, दिग्विजय पवार, सौ. अनिता पवार ,डॉ.केशव शिरसे, डॉ. पी.ए झगरे ,डॉ.प्रकाश नागणे ,  इंडियाग्रोचे सल्लागार स्वप्निल नेव्हे , 

 यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.