Ticker

6/recent/ticker-posts

घोटी बु.येथे लोककलावंतांची बैठक संपन्न



प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, इगतपुरी. 

दि.21/01/2026, रोजी. भारत सरकार नोंदणीकृत अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती, या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट या ठिकाणी इगतपुरी त्र्यंबकेश्वर व नासिक सिन्नर तालुक्यातील लोककलावंतांची बैठक संघटनेचे संस्थापक प्रमुख गायक सोमनाथ गायकवाड, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील कलावंत /साहित्यिक /वारकरी/ भजनी मंडळ यांच्या प्रलंबित प्रश्नावर आणि विविध येणाऱ्या समस्या व अडचणी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. आणि म्हणून तालुक्यातील लोककलावंतांचे अनेक प्रस्ताव मानधनासाठी प्रलंबित असून हजारो कलावंत हे वर्षानुवर्ष मानधनापासून वंचित असल्यामुळे उपस्थित सर्व लोक कलावंतांनी कलावंत मानधन योजनेच्या बाबतीत बैठकीमध्ये असंतोष व्यक्त केला.

            इगतपुरी /त्रंबकेश्वर /सिन्नर तालुक्यात जवळजवळ लाखो लोककलावंत आहेत मात्र हे सर्वच कलावंत असंघटित आहेत त्यामुळेच शासकीय योजनांपासून वंचित असल्यामुळे या सर्व कलावंतांना यापुढील काळात महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनांचा परिपूर्ण लाभ मिळावा याकरिता तालुक्याचे आमदार श्री. हिरामण खोसकर, आणि जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद साहेब यांच्या प्रमुख उपस्थित येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "लोककलावंतांचा महाक्रांती मेळावा" घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

          सदर बैठकीला उपस्थित सर्व लोक कलावंतांना शासकीय विविध योजनेच्या बाबतीत संघटनेचे संस्थापक प्रमुख गायक सोमनाथ गायकवाड, यांनी परिपूर्ण माहिती दिल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कलावंतांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष शाहीर नानासाहेब सोनकांबळे, यांनी केले तर उपस्थित कलावंतांचे आभार इगतपुरी तालुका अध्यक्ष ईश्वरजी भागवत, लोकराज्य प्राईम न्युज मुख्य संपादक: सुनील डी.पगारे, रवींद्र भागवत, यांनी मानले.

       सदर बैठकीला लोककलावंत शामराव जाधव, किसन आगिवले, ज्ञानेश्वर शेळके, गणेश दराने, चंदर मोशी, पंढरीनाथ तारडे, निवृत्ती दखणे, दिलीप धोंगडे, देवराम करवर, कांतीलाल धराणी, सोमनाथ जाकिरे ,सिताराम दराने,पत्रकार:शिवनाथ घोटकर, आदींसह असंख्य कलावंत आवर्जून उपस्थित होते.