अनिकेत चांदणे प्रतिनिधी
निंबी तालुका बाळापूर जिल्हा अकोला या गावांमध्ये जिओ या कंपनीचे सिम कार्ड बऱ्याच नागरिकांकडे आहे जिओचे दिवसान दिवस रिचार्ज प्लॅन जास्त पैशाने आकारल्या जात आहे परंतु तरीसुद्धा निंबी या गावापासून 2.5 किलोमीटर लांब जिओचे टॉवर बसवण्यात आलेले आहे परंतु गावा मध्ये पाहिजे तेवढी जिओ या सिम कार्ड धारकांना पाहिजे तेवढे इंटरनेट मनासारखे वापर जातले जात नाही निवड साधारणता फोनवर बोलायचं जरी म्हटलं तरी घरापासून किती दूर येऊन बोलावं लागत आहे या गावांमध्ये उंच शिक्षण माध्यमिक शिक्षण पोलीस भरती सरळ सेवा स्पर्धा परीक्षा व शासकीय व खाजगी नोकरी करणाऱ्यांना आणि शेतकरी सेतु संचालक सीएससी संचालक या सर्व नागरिकांना हवे तितकं इंटरनेट उपलब्ध नसल्याकारणास या जिओ कंपनीकडून नेटवर्कचा फार त्रास होत आहे जिओनी कस्टमर केअर हेल्पलाइन सुद्धा यांनी बंद केलेला आहे जिओ कंपनीच्या स्थानिक जागेवर कर्मचारी काम करत असताना नागरिकांनी त्यांना तोंडी स्वरूपात आपली व्यथा सांगितली परंतु जिओनी एकच उत्तर दिली हे तात्पुरती अडचण आहे तुमची अडचण थोड्याच दिवसात आम्ही यामध्ये सुधारणा करू परंतु अद्यापही जिओने कुठलंही आपलं नेटवर्किंग सपोर्टेड टीम तैनात केली नाही असा आरोप निंबी गावातील जिओ ग्राहक करत आहे





Social Plugin