Ticker

6/recent/ticker-posts

व्यापारी महासंघाच्या तालुकाअध्यक्षपदी महादूसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड .



प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

भोकरदन: येथे दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी व्यापारी महासंघाची बैठक पार पडली. यावेळी जालना जिल्हाअध्यक्ष हस्तीमल बम, मकरंद शहापूरकर, वकील सौ. आनंदी अय्यर, मोहन शेठ हिवरकर, विजय धोंगडे, तरुणशेठ पानसरिया, मयूर बाकीवाल, यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी महासंघाचे

तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली.   यामध्ये तालुकाध्यक्ष महादूसिंग राजपूत, सचिव पदी योगेशजी शर्मा, यांची तिसऱ्यांदा बिनविरोध तर उपाध्यक्षपदी तरुण शेठ पानसरिया, कार्याध्यक्ष मोहन शेठ हिवरकर, कोषाध्यक्ष विजय धोंडगे यांची निवड करण्यात आली.  यावेळी भोकरदन शहरातील सर्व व्यापारी उपस्थित होते.