अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
लोकजगतच्या संपादक शेख आयेशा यांचा वाढदिवस 1 जानेवारी रोजी बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील निराधार,बेघर असलेल्यांच्या सोबत साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर नववर्षाच्या प्रारंभी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्र,नवीन भाजी मंडई, बीड येथे दुपारी 12 वाजता लोकजगतच्या संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या महिला बीड जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांचा वाढदिवस बेघर,निराधार यांना गोड जेवण देऊन सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येणार आहे.वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनी याच ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमाला पाठबळ देत कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin