अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड शहरातील विक्रमशिला प्राथमिक निवासी शाळेची शैक्षणिक पालक भेट संपन्न झाली या शैक्षणिक पालक भेट कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी पालक मा.श्री.अशोक गायकवाड व प्रमुख पाहुणे पंढरी पार्क चे सर्वेसर्वा मा.श्री मधुकर घुमरे सर व गुरुकुल चे संचालक संजय जाधव सर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंलन संस्थेचे शिक्षक योगेश हरणे सर यांनी केले तसेच स्वागत गित विद्यार्थी अमन शेख,गायत्री जाधव,प्रशांत वाघ याने केले.संस्थेचे आगामी शैक्षणिक नियोजन कसे असेल यावर संचालक मा.श्री संजय जाधव सर यांनी सांगितले तसेच भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेत स्पर्धा परिक्षा घेण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते विराट तवार, करण झणझणे,यशराज धानुरे,वेदांत वाघ,सोहम भुकेले,शिवराज सोमासे यांना बक्षिस देण्यात आले.
विद्यार्थींनी नेहमी अशाच स्पर्धा परिक्षा द्याव्या व अशीच अभ्यासात प्रगती करत राहावी अशा शुभेच्छा अशोक गायकवाड व मधुकर घुमरे सर यांनी दिल्या विद्यार्थींची चांगली प्रगती पाहुन सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले.व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विराट तवार याने केले.यावेळी मोठ्या संख्येने पालक,विद्यार्थी व संस्थेचे शिक्षक संजय जाधव सर,योगेश हरणे सर,प्रमोद मस्के सर,सौ.शितल जाधव मॅडम,सौ. योगिता शिंदे मॅडम यावेळी उपस्थित होत्या.





Social Plugin