*_महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपले._*
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांच्यावर 28 जानेवारी रोजी काळाने घाला घातला त्यात त्यांचा व त्यांच्यासोबत असलेले वैमानिक त्यांचे बॉडीगार्ड यांचा मृत्यू झाला त्याला पाहता महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले.यावर खळेगाव येथील हनुमान मंदिरावर 30 जानेवारी रोजी गावकऱ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
माणसं सांभाळण्याची हातोटी,सहकार,राजकारण,अर्थकारण यामध्ये तरबेज विधिमंडळातील एक मर्द नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा होती. कटाक्षाने तंतोतंत वेळ पाळणारे आणि वेळेला अत्यंत महत्व देणारे अजित दादा पवार यांचा दबदबा होता. त्यांनी सर्वच पक्षाच्या आमदारांना निधी दिला आहे.निधी वाटप करतांना त्यांनी कधी राजकारण केले नाही.आणि दादांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही.असे उद्गार श्रद्धांजली अर्पण करतांना वक्त्यांनी काढले.दादांच्या लाडक्या बहिणी सुद्धा ह्या श्रद्धांजली च्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने हजर होत्या.दादांच्या जिवन चरित्रावर भाषण सुरु असतांना काही लाडक्या बहिणींना अश्रू अनावर झाले.आणि लाडक्या बहिणींचा अश्रूचा बांध फुटला.शेवटी दादांच्या आणि दादा सोबत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व सहकार्याच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी गावातील सर्व महिला व पुरुष यांच्याकडून अजित दादांच्या प्रतिमेचे श्रद्धांजली अर्पण केली. आणि सामूहिक पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी,गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर होते.
.jpg)




Social Plugin