Ticker

6/recent/ticker-posts

महसूल विभागाचा दरारा संपला? तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होऊनही वाळू माफियांचे धाडस वाढले!.



वार्ताहर लक्की राठोड मांडवी नांदेड

शासकीय कर्तव्य बजावत असताना महसूल अधिकारी आणि तलाठ्यांवर हल्ले होण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच एका तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच, गुन्हे नोंद होऊनही वाळू माफिया अधिक सक्रिय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, 'प्रशासनाचा वाळू माफियांना आशीर्वाद आहे की काय?' असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

काही दिवसांपूर्वी मांडवी येथील तलाठ्याने अवैध वाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला असता, वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनचे मांडवी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईनंतर वाळू माफियांचे धाडस कमी होण्याऐवजी उलट ते अधिक आक्रमक झाले आहेत.वाळू माफियांच्या या वाढत्या दहशतीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे, पण सरकारी तिजोरीचाही कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणती विशेष मोहीम राबवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.