नांदगाव खंडेश्वर तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरू
नांदगाव खंडेश्वर — नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी कृषी अधिकाऱ्यांना युरिया खत तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले होते. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध झाले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई होती. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती.
नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर कृषी विभागाने याची दखल घेत तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांमध्ये युरिया खताचा पुरवठा सुरू केला आहे.
यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.





Social Plugin