गौरव ब्राम्हणवाडे (@ग्रामीण प्रतिनिधी)
शहरातील बस स्टॉप परिसरातील मेन रोडलगत प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने पाणपोई सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे, राहुल गेडाम आणि वैभव कोडवते यांनी पाहणी करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव मांडला.
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत बसची वाट पाहणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासते. बस स्टॉप परिसरात पाणपोई उपलब्ध झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमासाठी स्थानिक कार्यकर्ते विक्की भगत, अभिषेक पवार, विजय सोनोने आणि संदीप अंबुरे उपस्थित होते. पाणपोई लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





Social Plugin