तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई:- आंतरराष्ट्रीय नामांकन (आय एस ओ ९००१-२०१५) प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित ' राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार २०२६' साठी कळसंबर येथील दिपक धन्वे यांची निवड करण्यात आली आहे . कला (गायन) क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दिपक धन्वे यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
हिंदी मराठी पत्रकार संघ व दर्पण वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी "राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराचे" आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला , इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये *कळसंबर येथील गायक दिपक धन्वे यांनी आपल्या सुमधूर आवाजाने लोकांचे मनोरंजन करत , लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप निर्माण केली आहे.* याच कलेची *दखल घेऊन. कला* क्षेत्रातील दर्पण रत्न पुरस्कारा साठी त्यांची निवड करण्यात आली असून मंगळवार दिनांक 6 जानेवारी २०२६ रोजी मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तेथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.





Social Plugin