Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीने मोठ्या प्रमाणावर विजय संपादित केल्याने कळमनुरी मध्ये जल्लोष.



दिनेश पत्की कळमनुरी हिंगोली 

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीने मोठ्या प्रमाणावर विजय संपादित केल्याने जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

      भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आमदार गजाननराव घुगे व विधान परिषदेच्या मा आमदार डाँ प्रज्ञाताई सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महायुतीने महाराष्ट्र राज्यातील मुंबईसह, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या प्रमुख महानगरपालिकेमध्ये भाजपा व महायुतीचे उमेदवार निवडून येत सत्ता स्थापन केली इतिहासात पहिल्यांदाच महानगरपालिकेमध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश संपादन केल्याने कळमनुरी शहरात फटाक्याच्या अतिशबाजीत जल्लोष साजरा केला व मतदारांचे आभार मानले.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष ओंकार नावडे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष विठ्ठल भोयर, मा जि. प.सदस्य दत्तराव माहोरे, नगरसेवक प्र. प्रकाश नाईक,नगरसेवक राजू जाधव, जि सरचिटणीस उमेश सोमाणी, विक्रम शिंदे, विकास ठाकूर, दौलतराव धनवे, जिद्दी पाटील, इंदेश काबरा, गोविंद माणियार, मसाराव करे, सोपान घुगे,अनिल इंगळे, नारायणराव डुरे, हरीश भोसले, महिला आघाडीच्या वर्षाताई खंदारे,सुहास गुंजकर,वसंतराव पतंगे, राहुल मेने, शामराव मुळे, यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.