Ticker

6/recent/ticker-posts

रयत शिक्षण संस्थेच्या , महात्मा फुले माध्यमिक विद्यालय , कटगुण येथे भरला बालबाजार .



  जोतिराम काटकर  -सातारा जिल्हा प्रतिनिधी 

       महात्मा फुले माध्यमिक विद्यालय कटगुण ता .खटाव येथे शाळेच्या प्रांगणात बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत व्हावे व आर्थिक साक्षरता वाढीस लागावी या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक श्री .गायकवाड एस. आर साहेब तसेच शाळेचे सर्व श्री शिक्षक प्रतिनिधी यांनी बालबाजाराचे चांगल्या प्रकारे आयोजन केले .

      या बालबाजारात विद्यार्थ्यांनी लिंबू सरबत , रसना , भडंग ,भाजीपाला , खाद्यपदार्थ , अशा अनेक प्रकारचे स्टाँल बालबाजारात लावले होते .या बालबाजारासाठी कटगुण  , धावडदरे , उंबरमळे परिसरातील ग्राहकांनी आपली उपस्थिती लावली व बालबाजारातून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या.

    या बालबाजारातून जवळपास 15 हजार रूपयांची आर्थिक उलाढाल झाली. या बालबाजारातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच त्यांचे आर्थिक ज्ञान वाढीस लागावे हा उद्देश ठेवून बालबाजार भरवला होता .असे शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड एस.आर साहेब यांनी स्पष्ट केले.