Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्याच्या रकमेत अपहार करणाऱ्या ला श्राप .



ग्रामीण प्रतिनिधी /धनंजय आराध्ये माहूर

 माजी नगराध्यक्ष प्रा राजेंद्र केशवे यांनी दिला भ्रष्टाचार करणाऱ्यांना श्राप ,( शाप )सालदार रुपी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये  ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी व्यक्त केले मनोगत

श्रीक्षेत्र माहूर 

माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्यापोटी शासनाकडून प्राप्त झालेली दोन कोटीची रक्कम एजन्सीच्या नावे वळती करून घरकुल लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या तत्कालीन आजी-माजी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी एजन्सीला वळती केलेली रक्कम तात्काळ वसूल करून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी शेकडो लाभार्थ्यासह उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा देत माजी नगराध्यक्ष प्रा राजेंद्र केशवे यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्याची रक्कम खाणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांच्या अंगात आळ्या पडतील असा श्राप देऊन तात्काळ लाभार्थ्यांना हप्त्याची रक्कम द्यावी असे मनोगत व्यक्त केले

 तसेच या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले जेष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी अधिकारी आणि पदाधिकारी जनतेचे सालदार असून त्यांनी मालकाप्रमाणे वागू नये अन्यथा येथील देवदेवतांचा श्राप शाप त्यांना लागून कुळ नष्ट होतील असा शाप करण्यात त्यांनी दिला तसेच यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विनोद पाटील सूर्यवंशी यांनी येत्या दोन दिवसात घरकुलाच्या हप्त्याची रक्कम जमा न झाल्यात शिवसेना स्टाईलने आंदोलन सुरू करण्यात येईल असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला यावेळी घरकुल लाभार्थ्यांसह मान्यवर उपस्थित होते