लगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांचीही उपस्थिती
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस येथील कान्हा हॉस्पिटल , पत्रकार फारूक अहेमद मित्रमंडळ व तालुका पत्रकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र , कलगाव येथे आयोजित वंध्यत्व , स्त्रीरोग व अस्थिरोग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . स्थानिकांसह लगतच्या ग्रामीण भागातील २२१ रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला .दिग्रस येथील युवा अस्थिरोग तज्ञ डॉ पवन जाधव तसेच वंध्यत्व व स्त्रीरोग तज्ञ डॉ सोनल जाधव यांनी आपली सेवा दिली . आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्यारेलाल पवार , पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण इंगोले , गोपाल शाह , पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पी.पी.पप्पूवाले , फारूक अहेमद , यशवंत सुर्वे-पाटील , आनंद आडे , अनील राठोड , राजाराम राठोड आदी मान्यवर उद्घाटन समारंभात उपस्थित होते . सदर आरोग्य शिबीराला शिंदे-शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार वानखडे , माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूसिंग जाधव , माजी पंचायत समिती सभापती केशव राठोड , सुभाष पवार , एल.पी. राठोड , निलेश राठोड , अनुराग पाटील आदींनी सदिच्छा भेट देऊन शिबिराची मुक्तकंठाने प्रशंसा केली . यावेळी अत्यल्प दारात सोनोग्राफी व इतर तपासण्या करण्यात आल्या . यावेळी बीएमडी मशिनद्वारे हाडांची ठिसूळता तपासणी , मोफत सल्ला , उपचार व औषध वाटप करण्यात .
सदर शिबिरामध्ये अस्थिरोग , पाठदुखी , गुडघेदुखी , मणक्यांचा त्रास , सांधे तापसणी , हाडांची ठिसुळलता आदींवर उपचार करण्यात आले . स्त्रीरोगामध्ये मासिकपाळीच्या तक्रारी , महिलांच्या चाळीशीनंतरच्या समस्या , किशोरवयीन मुलींच्या समस्या , पाळणा लांबणी , वंध्यत्व निदान व उपचार , गर्भाशयामुख कॅन्सर निदान , गरोदर मातांसाठी मोफत तपासणी व सल्ला , श्वेतपदर निदान , रक्तदाब व गर्भाशय तपासणी व सल्ला , तसेच औषध वाटप करण्यात आले .
सदर आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुर्थ्वीराज चव्हाण , संतोष राठोड , सविता साळवे , शेखर चव्हाण , शिवम पवार , पुनम शिंदे , शिला राठोड , अष्टगाया खंडारे , विशु खोंडे , स्थानिक आशा स्वयंसेवक सुरेखा पवार , छाया मनवर , अनिता माडगुळकर , सविता राठोड , एएनएम अर्चना गावंडे , डॉ रोटे एमपीडब्ल्यू , सीएचओ डॉ माजिदुद्दीन आदींनी अथक परिश्रम घेतले .





Social Plugin