Ticker

6/recent/ticker-posts

अंजुमन उर्दु शाळेत क्रीडा महोत्सव व आनंद मेळावा उत्साहात संपन्न.



आनंद मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक धडे

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : शालेय शिक्षणासोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्यासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन केल्या जाते याच उदात्त हेतूने दिग्रस च्या अंजुमन ऊर्दू शाळेत क्रिडा महोत्सव व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात वर्ग पाच ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन व्यावहारिक ज्ञान घेऊन आपला आनंद उत्सव साजरा केला.

कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मुहम्मद रफीक पहेलवान व सचिव हाजी सज्जु पहेलवान यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धेत रनिंग रेस,निंबु चमचा,पोता रेस,संगीत खुर्ची,पीक अँड ड्रॉप सारखे खेळ घेण्यात आले तर गुरूवारी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल लावले .उत्कृष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असलेल्या या आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी वडा पाव, गुलाब जामुन, इडली, भेळ, चना-मोट, चाट कटोरी,पाणीपुरी, दहीपुरी, दहीबडे, कच्चा चिवडा, चकली, बिर्याणी, चायनीज फूड, पकोडे, मूग भजीया, फ्रुट चाट,फ्रूट कस्टर्ड, आणि बरेच काही यासारखे घरगुती खाद्यपदार्थ आणले आणि अनुभवाचा आनंद घेतला.आकर्षक सजावटीसह स्वादिष्ट पदार्थ बनवून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची खूप काळजी घेतली आणि सर्व स्टॉल्सवरील विक्री देखील खूप चांगली होती. एकूण ४० स्टॉल्स उभारण्यात आले होते.या पैकी तीन उत्कृष्ट स्टॉल्स ची निवड करण्यात आली विजेत्यांना 26 जानेवारी रोजी संस्था च्या उपाध्यक्षा खुर्शीद बानो यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात येईल.आनंद मेळाव्याच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान घेत खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागलेले पैसे व बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी लागणारी कसब आणि नफा या व्यावहारिक ज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून घेतली. मिळालेल्या नफ्यातून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न चित्ताचे वातावरण पाहायला मिळाले शेवटी सर्व विद्यार्थीयांनी या आनंद मेळाव्याचा उत्साहात जल्लोष केला.सदर कार्यक्रमात पालकवर्ग गावातील नागरीक व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.जियाउरहमान यांनी तर आभार नासीर नौरंगाबादे सर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मुहम्मद सोहेल जावेद सर यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यानी अथक परिश्रम घेतले.