Ticker

6/recent/ticker-posts

नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला योग्य न्याय देत धामणगाव रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू.-डॉ.अर्चना अडसड-रोठे(आक्का)






गौरव ब्राम्हणवाडे ( @ ग्रामीण प्रतिनिधी )

सर्वोदय नवदुर्गा उत्साही मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ व मित्रपरिवार, धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगाव रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. अर्चना अडसड-रोठे (आक्का), धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती सौ. मंजिरीताई भोगे, तसेच गटनेते व नगरसेवक श्री. नरेंद्रजी चौधरी यांचा भव्य सत्कार समारंभ अत्यंत थाटात व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

                   उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला-पुरुष नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात आनंद, अभिमान व उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.