बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला . यावेळी शाळेचा परिसर रांगोळ्या व देशभक्तीपर गीत यांनी सजवण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री अशोक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परेड तसेच संगीत कवायत सादर केली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी तसेच गावातील विविध अंगणवाड्या मधील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.कला गुणदर्शनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत रणसिंगवाडी येथील प्रांगणासादर करण्यात आला.यामध्ये विविध भाषणे , नृत्य,तसेच देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले.
याप्रसंगी गावातील दानशूर व्यक्तींनी भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी या विद्यालयासाठी विविध भौतिक सुविधा पुरवण्याच मदत केली . गावातील दानशूर व्यक्ती तसेच नोकरी, कामधंद्या निमित्त मुंबई, पुण्यात राहणाऱ्या व्यक्तींनी देखील याप्रसंगी मोठी मदत केली. यामध्ये श्री अशोक निंबाळकर यांनी शालेय स्वच्छतागृहासाठी साहित्य पुरवले. श्री संतोष शिंदे यांनी शाळेसाठी वायफाय ची सोय करून दिली .श्री चेतन धनाजी घाडगे ,श्री बापूराव जाधव व दीपक फडतरे ,अविनाश फडतरे यांच्या प्रयत्नाने रणसिंगवाडी गावातील मुंबई येथे असणारे ट्रेलर ड्रायव्हर यांनी शाळेसाठी ढोल ताशा दिला.श्री अजित रणसिंग, मयूर रणसिंग,श्री तुळशीराम शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान फडतरे, बचत गटातील महिला सदस्य या सर्वांचे सहकार्य लाभले.
भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी सारख्या विनाअनुदानित मात्र तरी देखील शालेय गुणवत्ता जपणाऱ्या शाळेसाठी जात, धर्म, पक्ष या सर्व गोष्टी बाजूला सारून ’माझे गाव माझी शाळा’ या आदर्श विचाराने अनेकांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला .आणि एक आदर्श घालून दिला .एकजुटीने सर्वांनी मदतीचा हात पुढे केला. याप्रसंगी गावचे सरपंच श्री सुखदेव रणसिंग ,उपसरपंच श्री विठ्ठल मसुगडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान फडतरे , विविध शालेय समित्यांचे सदस्य ,गावचे पोलीस पाटील श्री सुनील रणसिंग, श्रीअविनाश रणसिंग , श्रीगजानन घाडगे , सयाजी जाधव तसेच विविध सेवा सोसायटीचे चेअरमन ,व्हॉ चेअरमन, माता पालक संघाच्या सन्माननीय महिलासदस्य , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरीगोसावी सर व त्यांचा स्टाफ ,सर्व अंगणवाडी च्या महिला सदस्य ,आशा सेविका व भैरवनाथ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ माया पाटील मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सन्माननीय ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin