दिनेश पत्की कळमनुरी हिंगोली
लाखो रुपयांचा निधी खर्च करून कळमनुरी बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना, या कामात ठेकेदाराकडून होत असलेली मनमानी आता थेट घोटाळ्याच्या दिशेने झुकणारी असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नवीन बस स्थानकाच्या भक्कम इमारतीसाठी नियमानुसार जुना पाया पूर्णपणे काढून टाकून, नव्याने खोदकाम करून मजबूत पाया घालणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार मात्र थेट जुन्याच, मोडकळीस आलेल्या पायावर नवीन कॉलम उभारण्याचा निर्लज्ज प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार म्हणजे सरळसरळ तांत्रिक नियमांचा भंग असून भविष्यात अपघातास आमंत्रण देणारा गंभीर गुन्हाच आहे. प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेली ही बेजबाबदार कामगिरी पाहता "ठेकेदाराच्या खिशासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा खेळ सुरू आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लाखो रुपयांचा निधी मंजूर
होऊनही कामाच्या दर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने भ्रष्टाचाराचा संशय अधिक गडद होत आहे. या कामावर संबंधित अभियंते, एस.टी. प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे काय? असा सवालही उपस्थित होत असून, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार शक्य नाही, असे बोलले जात आहे. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी, संबंधित ठेकेदाराचे काम थांबवावे, दोषी अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि निकृष्ट काम पाडून योग्य पद्धतीने नव्याने बांधकाम सुरू करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर हा मुद्दा रस्त्यावर उतरवला जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील,





Social Plugin