Ticker

6/recent/ticker-posts

अजितदादांच्या निधनाने खटाव शोक मग्न तर एक कणखर नेतृत्व हरपल्याची मान्यवरांची भावना.

   


बुध दि  [प्रकाश राजेघाटगे ]

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी येताच . अनेकांना दुःखद धक्का बसला तर खटावमध्ये ग्रामस्थांनी त्याचे नित्यचे व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले. 

      शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय समोर आयोजित केलेल्या शोकसभेत सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली होती. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. खटाव मधील अनेक महत्त्वाच्या विकास कामात त्यांचे मोलाचे सहकार्य व योगदान आहे सर्वसामान्यांसाठी झटणारा प्रामाणिक नेता, राजकारणातील सर्वात शिस्तबद्ध, स्पष्ट वक्ता ,आणि कणखर नेता दादांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला होता.त्याला गमावण्याची वेळ काळाने आणली. अनेकांनी दादांचे अचानक जाणे महाराष्ट्राला हानिकारक असल्याचे, तसेच त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. तर सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा होता हे सांगताना त्या कार्यकर्त्याची नावानिशी व्यक्तिगत ओळख ठेवून त्याला हाक मारून सन्मानित करण्याची त्यांची पद्धत आणि असे सर्वसामान्यांची नेतृत्व गमावल्याचे दुःख अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

      याप्रसंगी अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेला शेवटचा संदेश माईक वरून ऐकण्यात आला आणि उपस्थित महिला तसेच ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.