Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक ३१ रोजी पारोळा येथे सर्वपक्षीय शोकसभा...



ज्ञानदिप पाटील @पारोळा प्रतिनिधी

     दिनांक २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री कै.  अजित दादा पवार यांचे झालेले अपघाती दुःखद निधन तसेच दिनांक २४ जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सचिव कै. नगराज रामभाऊ पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे.या दोघ मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

      येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या साठी सार्वजनिक,  शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्यरत असलेल्या नागरिकांनी या शोक सभेत सहभागी व्हावे असे आवाहन सर्व पक्षाचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते यांनी केले आहे.


-------------------------