Ticker

6/recent/ticker-posts

गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार



पर्ल्स पीपल्स वेलफेअर असोसिएशनचे प्रयत्न सुरूच राहणार पल्स कंपनीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार चंद्रकांत सांगलीकरची येरवडा जेलमध्ये रवानगी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल महाराष्ट्र सहित अनेक राज्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या पैशांतून करोड्यांच्या जमीनी घेऊन परस्पर विक्री...

 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

*PACL कंपनीच्या गाजलेल्या गुंतवणूक घोटाळ्यातील मुख्य आरोपी चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर* याची पोलीस कोठडी न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत वाढवली होती . आज  *पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता आरोपीची येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे* .

 या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने PACL कंपनीची *जमीन विक्री करण्यास बंदी घातलेली असतानाही, 2015 ते 2020 या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर जमीन विक्री केल्याचा गंभीर आरोप आरोपीवर आहे*. ही विक्री सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून केल्याचं तपासात समोर आलं आहे.

 *पोलीस तपासात असं आढळून आलं आहे की, आरोपी चंद्रकांत सांगलीकर हा 2005 पासून PACL कंपनीसाठी प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करत होता*. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कंपनीसाठी जमीन खरेदी करत *असतानाच, त्याने कंपनीचीच फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. कंपनीच्या पैशातून स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्या काढून, त्या कंपन्यांच्या नावावर जमीन घेतल्याचाही* आरोप आहे.               PACL *गुंतवणूकदारांच्या पैशातून आरोपीने सांगली, पंजाब आणि इतर ठिकाणी विविध व्यवसाय उभे केल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे*. 2005 पूर्वी आरोपीकडे काहीच नव्हतं, मात्र *आज तो हजारो कोटींचा मालक बनून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप गुंतवणूकदार संघटनांनी केला आहे*.

*हा संपूर्ण घोटाळा पल्स पीपल्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने उघडकीस आणला*. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बावधन पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर *पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासात पुण्यातील सुस परिसरातील जमीन विक्रीतून तब्बल 28 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालं. तसेच वाघोली आणि बेंगळुरू येथेही अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत*.

 या प्रकरणात आरोपीविरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट *कागदपत्रे तयार करणे, कट रचणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याने PACL कंपनीच्या नावावर असलेली* गुंतवणूकदारांच्या पैशातून घेतलेली जमीन *बेकायदेशीररीत्या विकून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे*.

*सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी* केली होती. हे सर्व मुद्दे लक्षात घेत न्यायालयाने आरोपी चंद्रकांत रामचंद्र *सांगलीकर याला 10 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती* .आज न्यायालयात हजर केले असता *आरोपीला येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे* . या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, *आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे*.

 पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून *पीएसीएल इंडिया लिमिटेड* कंपनीतील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष **अमोल घाडगे** यांनी सांगितले.

*पीएसीएल इंडिया लिमिटेड* या कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर होते. महाराष्ट्रासह सातारा पुणे जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांनी चांगला परतावा मिळत असल्याचा विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती. मात्र, दहा वर्षांपूर्वी कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघडकीस आले. गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार माजी न्यायमूर्ती आर् एम **लोढा कमिटी**ची स्थापना करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच असोसिएशनच्या वतीने *श्री पांडुरंग पवार* यांनी तातडीने **बावधन पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल** केला 

या वेळी असोसिएशनचे सहसचिव **दशरथ माने**, सदस्य **किशोर घाडगे**, **आनंदराव पवार**, **आप्पासो गायकवाड**, **कान्होबा थोरात** व **सौ. रुक्मिणी जाधव** उपस्थित होते.

अमोल घाडगे म्हणाले, *“पर्ल्स कंपनीतील गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी असोसिएशन वकीलांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील आहे. राहिलेले आरोपींना लवकरच पोलिसांकडून जे अटकेचे कारवाई केली जाईल.. व आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी* गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहील

चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर (बंडगार्डन रोड, पुणे), आकाश आनंद चौहान (लक्ष्मीनगर, दिल्ली), नितीन नारायण थोपटे (सिंहगड रोड, पुणे), चंद्रकांत बसनिंगा बामणे (जत, जि. सांगली), गोवर्धन बबन बांदल (सुसगाव, ता. मुळशी), प्रमोद तुकाराम चांदेरे (सुस, पुणे), रविंद्र मुरलीधर चिंचवडे (वाल्हेकरवाडी, चिंचवड), इंद्रजीत शंकर वाघमारे, राजेंद्र शंकर वाघमारे (दोघेही रा. ३९५, नाना पेठ, पुणे) व त्यांना मदत करणारे इतर मदतनीस अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पांडुरंग विश्वंभर पवार (४५, खराबवाडी, ता. खेड) यांनी शनिवारी (१८ ऑक्टोबर) याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.