Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर महाविद्यालयातील खेळाडूचा आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग



दि. १४ ते १७ दरम्यान चिरूअनंतपल्ली तामिळनाडू स्पर्धा

देगलूर / प्रतिनिधी

भारतीदासन युनिव्हर्सिटी,चिरूअनंतपल्ली तामिळनाडू, येथे दि.१४ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन (पुरुष) स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संघात देगलूर महाविद्यालयाचे खेळाडू प्रमोद गायकवाड याची निवड झाली आहे. या विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.०६ ते ११ जानेवारी दरम्यान महात्मा फुले महाविद्यालय, किनगाव येथे झाले.

विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ.संतोष द्याडे,महाविद्यालयचे प्रशिक्षक डॉ. निरज उपलंचवार व प्रा.दीपक वावधाने, प्रा हाके सीताराम, यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर  उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार,सूर्यकांत नारलावार,गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार,गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार,उपप्राचार्य प्रा. चमकुडे एम.एम. उपप्राचार्य डॉ.शेरिकर व्ही.जी.,पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील,कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे