Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकराव चव्हाण यांची निवड



पाटण (सातारा)(दिनकर वाईकर) 

 स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकराव चव्हाण  यांची एक मताने निवड करण्यात आली संघटनेचे संस्थापक, राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी   नुकतीच घोषणा केली. 

बोरगाव तालुका सातारा येथील कुबेर छाया मल्टीपर्पस हॉल मध्ये स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच पार पडली यामध्ये राज्य कार्यकारणी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला संघटनेचे संस्थापक,राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, राज्य कार्यकारणी व पश्चिम महाराष्ट्र, कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अधिकराव चव्हाण ,

 राज्य उपाध्यक्ष प्रदीपराव काशीद, राज्य खजिनदार शिवाजी खामकर, राज्य संपर्कप्रमुख विजय काशीद, राज्य प्रसिद्धीप्रमुख नारायण यादव,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नवनाथ काशीद ,पश्चिम महाराष्ट्र खजिनदार दत्तात्रय तावरे ,पश्चिम महाराष्ट्र संघटक ,सुनील जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते कृष्ण जाधव, वरील सर्वांच्या निवड पुढील पाच वर्षा  करण्यात केले आहेत.

श्री चव्हाण यांनी यापूर्वी संघटनेच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, या पदावर काम करत असताना संघटनात्मक बांधणीसाठी केलेल्या प्रामाणिक कार्याची व निष्ठेचे दखल घेऊन तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली असल्याची राज्याध्यक्ष श्री गायकवाड यांनी सांगितले. 

यावेळी अधिकराव चव्हाण म्हणाले  स्वाभिमानी नाभिक  संघटना सर्वसामान्य  नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहे. समाजातील सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने नाभिक समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार आहे आत्ता  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करत असताना पूर्वीप्रमाणेच ग्रामीण भागाला केंद्रबिंदू मानून संघटनात्मक बांधणे तसेच समाजातील प्रश्न सोडून व्यवसायाच्या व समाजातील सर्व घटकांना सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्यास आपण कटिबद्ध असल्याचे तसेच आपण संघटनेमध्ये विविध पदावर काम करत असताना मिळालेला अनुभव याचा समाज उन्नतीसाठी उपयोगात आणून तसेच संघटनेची ध्येय धोरण विचारधारा यांच्याशी बांधील राहून आपण संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन समन्वयाने काम करणार असल्याची ग्वाही देत ग्रामीण भागात संघटना मजबुतीसाठी काम करणार असून स्वाभिमानी नाभिक संघटना ही पक्ष विरहित काम करणारी आहे संघटनेचे ध्येय धोरणाचे पालन करून समाजाच्या न्याय हक्कासाठी , समाज प्रगतीसाठी , नाभिक समाजातील युवकांना कौशल्य विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार असून समाज हितासाठी आपण कायम बांधील राहून काम करू असे आश्वासन यावेळी अधिकराव चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले. 

यावेळी राज्य कार्यकारणी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यावेळी मीटिंग साठी  उपस्थित असणारे पदाधिकारी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड, राज्य सरचिटणीस मंगेशराव काशीद, राज्य महिला सदस्या अनिताताई काशीद, रामभाऊ पवार, सातारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, पाटण तालुकाध्यक्ष बाबुराव पवार, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष अर्जुन  सूर्यवंशी, कराड उत्तर तालुका अध्यक्ष गणेश कदम,  जिवाजी महाले समितीचे सदस्य संग्राम माने, विष्णू सपकाळ, दाजी सुर्वे, संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते प्रस्ताविक राज्य सरचिटणीस मंगेश काशीद यांनी केले आभार रामभाऊ पवार यांनी मानले