Ticker

6/recent/ticker-posts

रणसिंगवाडीच्या आप्पा घोरपडे यांना हैद्राबाद मध्ये राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित.



बुध दि .. [प्रकाश राजेघाटगे ]

रणसिंगवाडी  ता . खटाव येथील आप्पा घोरपडे यांना   हैद्राबाद येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . जिंदगी फॉउंडेशन आणि अखिल मारवाडी युवा मंच यांनी हैद्राबाद मध्ये राष्ट्रीय सन्मान सोहळाचे आयोजन केले होते.कारगिल योद्धा नायक दीपचंद सर यांच्या हस्ते हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले अवॉर्ड कार्यक्रम बरोबर सिकल सेल थालेसेमिया मुलासाठी भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीर मध्ये प्रत्येक राज्य मधून आलेले रक्तदाते यांनी सुद्धा रक्तदान केले 

 कोणताही रुग्ण रक्त नाही मिळाले म्हणून दगावू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2015 पासून रक्तदान क्षेत्रात आप्पा घोरपडे कार्य करत आहेत.आता आप्पा घोरपडे यांनी 42 व्या रक्तदान केलेला आहे. आप्पा घोरपडे हे हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णास मोफत ब्लड ची सोय  या संदर्भात कार्य करतात तसेच रक्तदाते सुरक्षिततासाठी त्यांचा विषय हा लोकसभेमध्ये सुद्धा गेलेला आहे.रक्तदान करून झाल्यानंतर रक्तदात्यांच्या सेवा सुविधा मिळवण्यासाठी त्यांचा लढा अविरतपणे लढा चालू आहे.आतापर्यंत हजारो रुग्णांसाठी रक्ता ची मोफत सेवा दिलेली आहे.

 रक्तदात्यांच्या सुरक्षिततासाठी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रक्तदात्यांसाठी विमा पॉलिसी चालू केली गेली. पॉलिसीच्या मुळे गंगाधर काळे या डोनरचे अपघाती निधन झाले त्यावेळेस त्यांच्या वारसदारांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत विमा मुळे करण्यात आली

 भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रक्तदात्यांसाठी विमा करून दिल्यामुळे एखाद्या रक्तदात्याला एवढी मोठी रक्कम मदत पहिलीच घटना होती.रक्तदात्यांचे सुरक्षितता ही खूप महत्त्वाच विषय आहे हे सरकारला त्यांनी पटवून दिले. हर्ष फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी हे महाराष्ट्र,महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी मोफत रुग्णसेवा.रक्तदान सेवा करीत असतात.

 हर्ष फाउंडेशनचे व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे काम चालते.आप्पा घोरपडे यांना या आधी सुद्धा राज्य आणि राष्ट्रीय लेव्हलला खूप पुरस्कार मिळालेले आहेत. भारतीय पोस्ट ऑफिस यांनी आप्पासाहेब घोरपडे यांचा 12 स्टॅम्प तिकीट देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे या पुरस्कार सोहळ्यात प्रत्येक राज्यातून रक्तदान क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सहकारी हैद्राबाद शहरात आले होते