Ticker

6/recent/ticker-posts

जालना येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच पत्रकारांना पोलीसांची धक्का बुक्की पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार.





  पत्रकारांची घोषणा बाजी पत्रकारां कडुन जाहीर निषेध.पंकजा मुंडे नी घेतला काढता पाय

 । जालना प्रतिनिधी संजीव पाटील।

 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी च लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार मिडिया वर  पोलीसांकडून धक्का बुक्की झाल्या चां धक्कादायक प्रकार जालना  येथे घडलाय जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ध्वजारोहण करण्यासाठी 26 जानेवारी सोमवार रोजी जालना येथे आल्या असता काही मिडिया टी.व्ही.पत्रकार व्हिडिओ शूटिंग करत असतानाच पोलीसांकडून धक्का बुक्की करण्यात आली. ध्वजारोहण झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कडुन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.पत्रकारांनी घोषणा बाजी करत पत्रकारांना पोलिस कडुन  झालेल्या धक्का बुक्की चां जाहीर निषेध करत पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.या मुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेतला.