हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे या प्रेरणादायी ओळींच्या गजरात जि.प.प्राथमिक शाळा पुरी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती वंदनाताई राऊत, ग्रामपंचायत पुरीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ मोरे व सदस्य, गावातील ज्येष्ठ मंडळी श्री मधुकर दादा मोरे,श्री अरुण बाकलीवाल, श्री अनिस पटेल श्री भरत मोरे,डॉ.सलीम पटेल पठाण,
सरपंच पती अविनाश भाऊ राऊत उपसरपंच श्री संतोषभाऊ मोरे,ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश मोरे,हुसैन पटेल, श्री रामदास मोरे,सौ.कमलाबाई मोरे,श्री भास्कर खंडागळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष्य नवनाथ मोरे,उपाध्यक्षा सौ. जिजाबाई मोरे, शालेय व्यवस्थापन सदस्य श्री रामेश्वर मोरे, श्री किशोर खंडागळे, श्री दादासाहेब सरोदे,श्री राजेंद्र तिवारी, श्रीमती अलकनंदा मोरे,श्री. रेवनाथ प्रधान,श्रीमती मनीषा गिरी सर्व पालक वर्ग..
तसेच जि.प.प्रा.शा. पुरीचे मुख्याध्यापक शिवाजी मोरे सर, भाऊसाहेब भिसे सर, गंगापूर तालुका शिक्षक सहकारी पतपेढी संस्थेचे चेअरमन सतीश कबाडे सर यांच्यासह अजित तांबे सर, मनेश दारकुंडे सर,अशोक सोनवणे सर, संगीता इंगळे मॅडम,हर्षा खरात मॅडम,सविता मस्के मॅडम, ऐश्वर्या तुपे मॅडम, शिरवत सर,सोलट सर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी मोरे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहन नंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, लेझीम, कवायती तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील भाषणे सादर करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनी आराध्या व गौरी यांनी अत्यंत आत्मविश्वासाने केले.
विविध शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. तसेच पुरी गावचे डॉ. सलीम पठाण यांना त्यांनी मिळवलेल्या पुरस्काराबद्दल शाळा व समस्त ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मनेश दारकुंडे सर यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या या उत्साहपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकूणच हा सोहळा राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा ठरला.





Social Plugin