प्रतिनिधी: निरंजन बावस्कर
भोकरदन: येथील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष विजय झाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी कुणाची वर्णी लागेल ही चर्चा भोकरदन शहरात चालू असताना भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यामध्ये उपनगराध्यक्ष पद कोणाकडे जाते अशी चर्चाला उधाण आले असता दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी.उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सौ.सुरेखाताई बाळासाहेब जाधव यांची भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड झाली.





Social Plugin