Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या सुरेखाताई बाळासाहेब जाधव देशमुख यांची निवड




 भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील


भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्य यांची आज निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी सौ. सुरेखाताई बाळासाहेब जाधव देशमुख यांची निवड झाली आहे.तर भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने यांची स्विकृत सदस्य पदी निवड करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नईम काद्री यांची स्विकृत सदस्य पदी निवड झाली आहे. यावेळी उपाध्यक्ष पदासाठी सौ.सुरेखाताई जाधव यांच्या नावांची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा च्या कार्यकर्ते कडुन मुकेश चिने यांचे  पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.नईम काद्री  यांचेही राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या कार्यकर्ते नी जोरदार स्वागत केले

 यावेळी  माजी आमदार चंद्रकांत दानवे,नगराध्यक्ष  समरीन मिर्झा बेग, सुधाकर दानवे, अंकुश जाधव,शपीक पठाण, चंद्रकांत पठारे नईम काद्री, गंगाधर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. भोकरदन नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांचा नगराध्यक्ष असुन नगराध्यक्ष सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नऊ सदस्य निवडून आले आहेत. उपाध्यक्ष निवडणूकीत नगराध्यक्ष ला स्वतः चे एक मत देण्याचा अधिकार आहे नऊ सदस्य अधिक नगराध्यक्ष चे मतदान बहुमत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या सौ.सुरेखाताई जाधव देशमुख उपाध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या आहेत. भाजपा चे आठ तर शिंदे शिवसेना गटाचे एक सदस्य नगरसेवक निवडून आलेला आहे त्यामुळे भाजप शिवसेना नऊ नगरसेवक निवडून आले आहेत.काॅग्रेस चे दोन नगर सेवक विजयी झाले आहेत.एकुण 20 नगर सेवक स्विकृत सदस्य दोन एकुण 22 सदस्य आहेत.