Ticker

6/recent/ticker-posts

गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर यांच्या आदेशाला ग्रामपंचायत अधिकारी वलखेड यांनी दाखवली केराची टोपली.






परतुर प्रतिनिधी

मौजे वलखेड ता.परतुर येथील ग्रामस्थ दत्ता प्रल्हाद अंभोरे व इतर ग्रामस्थांनी 26 जानेवारी 2026 अगोदर ग्रामसभा घेणे बाबत गटविकास अधिकारी यांना दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी विनंती अर्ज सादर केला होता त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जालना यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक:- 25 /01/ 2026 रोजी ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच यांना दिनांक :-13 /01/ 2026 रोजी पत्र काढून आदेशित केले व तक्रारदारास माहितीस्तव एक प्रत देण्यात आली ज्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक:- 25 /01/ 2026 रोजी ग्रामसभा होणार असल्याचा उल्लेख केलेला होता

तरी दिनांक:- 25/01/ 2026 रोजी तक्रारदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालय वलखेड तथा मारोती मंदिरासमोर तक्रारदार व अन्य ग्रामस्थ थांबले होते नंतर सकाळी ठिक ११:०० ते १२:०० वाजेच्या सुमारास पत्रकारही ग्रामसभेच्या ठिकाणी उपस्थित होते नंतर ग्रामपंचायत अधिकारी यांना कॉल केल्याच्या नंतर असे निदर्शनास आले की आज ग्रामसभा होणार नाही नंतर तक्रारदाराची इच्छा ऐकत असताना तक्रारदार म्हणाले की जर आज ग्रामसभा झाली नाही तर मी आत्मदहन करील व याची सर्वजवाबदारी गटविकास अधिकारी परतुर ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालय सरपंच वलखेड यांची व प्रशासनाची राहील असे बोलत असताना मध्येच सरपंचाचा मुलगा तक्रारदादास तू फाशी घेतली तरी काही फरक पडणार नाही असे म्हणल्याने वातावरण तापले ग्रामस्थांच्या मदतीने प्रकरण शांत झाले