प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई
बीड-वाचतंय या उपक्रमाअंतर्गत आज गेवराई तालुक्यातील कटचींचोली या ठिकाणी महिलांसाठी हळदीकुंकू आणि सरहद फाऊंडेशन,समीधा फाऊंडेशन,अरहम फाऊंडेशन आणि सकल मराठा परिवार-बीड या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री कोळी सर, श्री रूपनर सर (पो.स्टे.तलवाडा) आणि रेवकी केंद्रप्रमुख श्री सुळे सर उपस्थित होते.
दररोज संध्याकाळी ठिक ६:५५ वाजता मंदीरातील स्पीकर वरून ७ ते ८ वाजेपर्यंत सर्वांनी आपले मोबाईल व टिव्ही बंद करून आपल्या मुलांना अभ्यासाला बसवावे असे पालकांना आवाहन करण्यात येते.
तलवाडा पो.स्टे.चे श्री कोळी सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून, पोलीस भरतीची पुर्व तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर श्री रूपनर सर यांनी NDA संदर्भात मौलीक मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख श्री सुळे सर यांनी मोबाईल चे होणारे नुकसान व फायदे,तसेच बालविवाह चे महत्व समजावून सांगितले.
बीडहून आलेले प्रा.रोहन काकडे सर, दिग्विजय काळे सर यांनी या उपक्रमाचे सवीस्तर महत्व विशद केले.आणि विद्यार्थ्यांना लागेल त्या वेळी योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली.
कटचींचोली येथील डॉ.तुळशीराम आन्ना खोटे यांनी आरोग्य, गर्भसंस्कार व शैक्षणिक जिवनातील महत्त्वाचे टप्पे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
शेवटी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे संदीप खोटे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला आणि विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





Social Plugin