गौरव ब्राम्हणवाडे (@ग्रामीण प्रतिनिधी)
नांदगाव खंडेश्वर शहरात मागील काही दिवसांपासून एक अनोळखी व्यक्ती आजूबाजूला फिरताना दिसत होता. आज त्या व्यक्तीची तब्येत अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली. हे लक्षात येताच समाजसेवक अविनाश ब्राम्हणवाडे राहुल गेडाम, शिवा सोनोने, राहुल बावणे, शुभम बावणे, अजय सोनोने, अंकुश ब्राम्हणवाडे, राहुल रावेकर यांनी तात्काळ पुढाकार घेत संबंधित व्यक्तीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वेळीच मदत मिळाल्याने त्या व्यक्तीवर उपचार सुरू झाले असून नागरिकांनी समाजसेवकांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. या घटनेमुळे आजच्या धावपळीच्या जीवनातही माणुसकी अजून जिवंत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.





Social Plugin