Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या नगर परिषद परिसरात हॉटेल व्यवसायिकाने नव्याने केलेले अतिक्रमण तात्काळ हटविणे.

 

नगर परिषद परिसरात हॉटेल व्यवसायिकाने नव्याने केलेले अतिक्रमण तात्काळ हटविणेणे बाबद.

गौरव ब्राम्हणवाडे (@ग्रामीण प्रतिनिधी)

नांदगाव खंडेश्वर येथील नगर परिषद मधील जागेमध्ये विहिरीजवळ श्री भामुद्रे हॉटेल व्यवसापिक यांनी 4-5 दिवसापूर्वी नव्यानेच अतिक्रमण करुन फ्लोरिंग, टिन पत्र्याचे शेड उभारून नगर पंचायत च्या मालकीची शासकीय जागा ताब्यात घेतलेली आहे.

निवडणूक निकाल लागल्याबरोबर अगदी तातडीने घडून आलेला हा घटनाक्रम नगर पंचायतचे प्रशासकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे.

 यामुळे नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत स्वमालकीच्या शासकीय जागा रक्षणार्थ समर्थ नाही अशी नकारात्मक प्रतिमा जनमानसामध्ये निर्माण होऊ शकते, व प्रशासकीय दृष्टीकोनातून अशा नियम व कायदे मोडणाऱ्या व्यक्तीवर प्रशासनाचा धाक राहणार नाही.

त्यामुळे संबंधित अतिक्रमण धारकांस तातडीने कायदेशीर नोटीस बजावून केलेले अतिक्रमण 7 दिवसाचे आत हटविण्यात यावे, हि विनंती.अन्यथा नगर पंचायतचे विद्यमान प्रशासकीय इमारतीत खोका टाकून प्रतिकात्मक आंदोलन केले जाईल.आपला. --नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे व राहुल गेडाम नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर.