Ticker

6/recent/ticker-posts

गाव पुरळ केळयेवाडी येथे डोंगर उतार रस्त्याचे भूमिपूजन



देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 

 गाव पुरळ केळये वाडी येथे डोंगर उतार रस्त्याचे भूमिपूजन याचे काम माननीय सरपंच सौ. अनुश्री  तावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयाचे क्लार्क श्री संजय अनभवणे. ग्रामपंचायत सदस्य सौ. अंकिता पुजारे, व पुरळ ग्रामस्थ संतोष घाडी  हे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. सदर या कामाची रूपरेषा अशी आहे हे काम जे आहे हे दुरुस्तीचे असे स्वरूपात आहे. हा रस्ता दुरुस्तीला घेतला असून त्याचे उद्घाटन माननीय सरपंच सौ. अनुश्री तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत केळये वाडीतील ग्रामस्थ खजिनदार श्री संदीप डांबरे, श्री श्यामसुंदर शिर्के. श्री मनोहर शिर्के, श्री अंकुश शिर्के, श्री श्यामसुंदर शिर्के, श्री सागर शिर्के, श्री अमोल शिर्के, कुमार सुजल घाटे, श्री उमेश शिर्के, श्री नारायण शिर्के, हे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. तसेच महिला वर्गामध्ये सौ सायली संदीप डांबरे, सौ अनिता अंकुश शिर्के, सौ रोशनी उमेश शिर्के, सौ गीता शामसुंदर शिर्के, हे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. पुरळ ग्रामपंचायत  माननीय सरपंच सौ अनुश्री तावडे यांनी या रस्त्याचे दुरुस्तीचे कामाचे उद्घाटन केल्याबद्दल आम्ही केळेवाडीतील ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत. 🌸