मन्सूर शहा धोत्रा भ.प्रतिनिधी :---
आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा धोत्रा भ. येथे शिक्षक विद्यार्थी शिक्षण व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांच्या सहकार्यातून आनंद, मेळावा शाळेच्या मार्फत लावण्यात आला होता. हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे लावण्यात आला याबद्दल माहिती शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री महाले सर यांनी अगदी आपल्या साध्या व सोप्या भाषेत पालक वर्गांना माहिती देत. कशाप्रकारे विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहाराची सुद्धा ज्ञान प्राप्त झाले पाहिजे असे प्रतिपादन मा. महाले सर यांनी पालक वर्गसमोर केले आहे.
शाळेतील आनंद मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेला एक उत्साहपूर्ण कार्यक्रम होता जिथे विद्यार्थी स्वतः खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावतात, आणि मनोरंजनासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळवतात, ज्याला पालक व गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळळा, जसे की धोत्रा. भनगोजी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये, 100चे वर स्टॉल, लावून आज आनंद मेळावा उत्साहात साजरे करण्यात,आला असून
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच आर्थिक व्यवहार, नियोजन आणि सामाजिक ज्ञान जीवनात येणे आवश्यक असते तसेच.विद्यार्थी स्वतः भेळ, पाणीपुरी,, वडापाव, चनाभेल, रगडा, गुलाब जामुन, चहा,बासुंदी, पुरीभाजी अशा, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची स्टॉल लावतात आणि विकतात. आणि त्यातून व्यवहारी ज्ञान आत्मसात करतात. आणि हे करत असताना या आनंद मेळाव्याचे उद्देश असे असते की मुलांना शैक्षणिक बरोबर व्यवहाराचे ज्ञान सुद्धा आले पाहिजे. जेणेकरून भविष्यात उद्याला जर नोकरी मिळाली नाही किंवा काही पर्याय कारण नोकरी मिळवण्यात आपल्याला अपयश आले तर आपल्याला काहीतरी व्यवसाय करून, कोणत्याही प्रकारे निराश न होता आपली उपजीविका भागवता आली पाहिजे.. आनंद मिळावा.अशा या शैक्षणिक व सामाजिक उपकरणात शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तसेच अशा प्रकारचे कार्य करत असताना कुठेतरी कोणालातरी याची श्रेय जात असते. तर या सर्वांचे मानकरी जिल्हा परिषद शाळा धोत्रा भ. येथील महाले सर व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य कर्मचारी वर्ग यांना देऊन पालक वर्गणी त्यांचे कौतुक करून. त्यांचे मनापासून अभिनंदन केले.





Social Plugin