Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर शहरातील अत्यन्त वाईट अवस्था अनेक वर्षांपासून पाण्याच्या टाक्या साफ झाल्याच नाहीत.

 


अमळनेर : गेल्या काही वर्षात अमळनेर नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या गेल्या नसल्याची भयानक बाब उघडकीस आली असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी दिली.  गाळ काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

डॉ परीक्षित बाविस्कर यांनी नगराध्यक्षपदाचा आणि बिल्डर प्रशांत निकम यांनी उपनगराध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारताच पालिकेत बारकाईने लक्ष देणे सुरू केले आहे.  वारंवार पाईप लाईन का तुटतात म्हणून डॉ बाविस्कर , प्रशांत निकम आणि पाणीपुरवठा सभापती यांनी पाणी पुरवठा यंत्रणेवर भेटी दिल्या असता त्यांच्या अशा निदर्शनास आले की जळोद , गांधली , अंबर्शी टेकडी आदि ठिकाणी साफसफाई न झाल्याने आणि कचरा अडकल्याने पाण्याचा दाब ३६० वरून ४१० वर गेला होता. पाईप एयर लॉक झाल्याने भवरी तयार होऊन पाईप तुटण्याचे प्रमाण वाढले होते. तेथील कचरा काढल्यानन्तर ३८० दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.

सभापती स्वतः उतरले टाकीत व्हॉलमन व वॉचमन असे ८ टाक्यांवर ७४ लोक असूनही ही परिस्थिती कशी आली ? त्यांनतर त्यांनी पाण्याच्या टाक्यांची पाहणी स्वतः करण्याचा प्रयत्न केला आणि लॉग बुक आणि कर्मचार्यांना विचारणा केली असता २००३ नंतर एकही पाण्याची टाकी साफ झालेली नाही. पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी स्वतः टाकीत उतरले त्यांचा श्वास गुदमरायला लागला होता.  तर सुमारे तीन ते चार फूट गाळ साचला असावा. तो गाळ पक्का झाला आहे.  त्यात शेवाळ , टीसीएल पावडर आणि घाण असू शकते. टाकीत उतरून गाळ काढणे अवघड आहे टाकीत पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. म्हणून सराईत गाळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून टाक्या साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टाक्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केबिन कंपाऊंड, लाईट, सोलर नसल्याचे सांगितल्या नंतर पालिकेने त्यांना प्रत्येक टाकीवर कार्यालय, लाईट व सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वसन दिले. इतके दिवस नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. दूषित पाण्याने अनेकांचे आरोग्य बिघडले असावे  मात्र आता नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या जातील- प्रशांत निकम, उपनगराध्यक्ष अमळनेर नवीन निवडून आलेले नगरसेवक जनतेच्या समस्या जाणून आहेत. जनसेवेबद्दल तत्पर आहेत. नागरिकांच्या सेवेबद्दल कुचराई केली जाणार नाही.- डॉ परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष अमळनेर कर्मचाऱ्यांनी नियमित टाक्या साफ करायला पाहिजे ,त्यावर पालिका कर्मचारी आणि अभियंते यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे. चौकशी करून  यापुढे तशी काळजी घेतली जाईल. - गणेश शिंदे ,मुख्याधिकारी ,अमळनेर टाक्यांमध्ये अनेक दिवसांपासून गाळ साचला असून आता टाक्या सफाईसाठी निविदा काढण्यात येतील. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिले जाईल.- कैलास पाटील , सभापती पाणीपुरवठा समिती अमळनेर.