रिसोड प्रतिनिधी :- विजय गायकवाड
रिसोड : येथील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्राचार्य डॉ. एम .एन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठी विभागाचे प्रा डॉ सिद्धार्थ के. इंगोले यांच्या नियोजनाखाली मराठी भाषा पंधरवडा जनजागृती कार्यक्रमानिमित्त "मराठी भाषेचे भावी भवितव्य टिकून राहावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले .निबंध स्पर्धा, वाद विवाद, कथाकथन,भाषण, प्रश्नमंजुषा,मराठी म्हणी, संग्रह इत्यादी विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
तसेच या विषयावर व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषा पंधरवाडा जनजागृती समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ. आदिनाथ.डी बदर यांनी मराठी भाषेविषयी जनजागृती संबोधित करताना असे म्हटले की. "मराठी भाषा ही प्रत्यक्ष बोलीत वापरल्या गेली पाहिजे. आणि ती जिवंत ठेवली पाहिजे. कारण की मराठी भाषा ही मुळातच पूर्वीपासूनच अभिजीत भाषा होती. मात्र आता तिला राजमान्यताही मिळाली असून या भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे . त्या शिवाय ती टिकणार नाही" असे प्रतिपादन केले.
या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ .के.व्ही कोकाटे सुत्रसंचलन प्रा. डॉ. तनय गोडे व आभार प्रणव जाधव या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin