दुधगाव / वार्ताहर :
येथील भाऊसाहेब कुदळे विद्यालय व बाबगौडा आण्णा पाटील (सांद्रे) ज्युनिअर कॉलेज, दुधगाव यांच्या सर्व माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील महावीर पाटील (सांद्रे) तर उपाध्यक्षपदी किरण नलवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार उत्साहात करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी सुनील पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात ते मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुनील पाटील यांनी माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद व संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शैक्षणिक व सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापक एम. पी. शिंगे, सर्व शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Social Plugin