पारनेर
गारगुंडी येथील अनेक लाभार्थ्यांचे रेशनकार्ड हेलपाटे मारून सुद्धा लोकांना मिळाले नव्हते ,परंतु टाकळी ढोकेश्वर गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या सोनियाताई राजदेव यांनी पुढाकार घेऊन टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात कॅम्प केले आणि त्यात गारगुंडी गावात रेशन कार्ड संदर्भात कॅम्प आयोजित करण्यात आला होता ,त्या कॅम्प मधील आलेल्या प्रकरणाचे निरसन झाल्यावर स्वतः सोनियाताई राजदेव यांनी झालेली सगळी रेशनकार्ड घरपोच आणून दिली .
यावेळी त्यांच्यासमवेत निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव ,नांदूर पठार चे मा.सरपंच भानुदास आग्रे ,गारगुंडी गावचे मा,सरपंच बाळासाहेब झावरे ,विलास झावरे ,शंकर झावरे ,अंकुश झावरे ,दिलीप झावरे ,राजेंद्र झावरे ,दिनकर फापाळे ,सुनील फापाळे ,विनायक ठुबे ,दिनकर फापाळे ,शिवाजी फापाळे , भास्कर फापाळे ,जयसिंगराव झावरे ,निजामभाई शेख , मुराद शेख , संदिप झावरे ,सुनीता परांडे ,मीराबाई झावरे ,वनिता झावरे ,सुनीता फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजदेव यांच्या वतीने गेल्या वर्षभरापासून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात रेशनकार्ड ,आधारकार्ड ,बांधकाम कामगार कार्ड ,आरोग्य कॅम्प अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविल्या आहेत त्यात आज तयार झालेली रेशनकार्ड बनवून एक रुपयाही ही न घेता त्यांनी स्वतः घरी येऊन दिली.
अनेक वेळा पारनेर तहसील येथे हेलपाटे मारून ,पैसे खर्च करून ,वेळ खर्च करून आतापर्यंत कोणतेही काम झाले नव्हते ,आणि ते राजदेव दांपत्याने पुढाकार घेऊन गोरगरिबांची कामे केल्याबद्दल राजदेव यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि समाधान व्यक्त केले.





Social Plugin