दुधगाव : येथील युवक राहुल विजय आडमुठे यांची भारतीय सैन्यात अग्निवीर पदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर सार्वजनिक वाचनालय, दुधगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
देशसेवेची संधी मिळवून राहुल आडमुठे यांनी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल वाचनालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विद्यासागर पाटील संचालक संदीप पाटील,विलास गावडे,सुधीर आडमुठे, सागर मोरे,प्रदीप आवटी,इरफान जमादार,ग्रामस्थ तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी बोलताना मान्यवरांनी राहुल यांच्या जिद्द, परिश्रम आणि शिस्तीचे कौतुक केले. त्यांच्या यशामुळे परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले. राहुल यांनीही आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक व मित्रपरिवाराला दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संदीप पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व अभिमानाच्या वातावरणात पार पडला





Social Plugin