उध्दव कवळे महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी
बुधवार हदगाव तालुक्यातील,तामसा या ठिकाणी काल झालेल्या भाजी भाकर यात्रा अतिशय आनंदामध्ये व शांततेत पार पडली.ही यात्रा सुमारे पावणे दोन वर्षापासून चालू आहे या यात्रेचे मुख्य भाजी भकर असून भावीक भक्त ही भाजी भाकर खाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात ही भाजी खूप गुणकारी असते यामध्ये विविध प्रकारची वनस्पती भाजीपाला फळे फुले इत्यादींचा समावेश असतो. ही भाजी खाल्याने अंगातील रोगराई दूर होते अशी येथील भक्तांची भावना आहे. यावेळी बारालिंग देवस्थान कमिटी तामसा ,तर्फे अतिशय छान अशे नियोजन करण्यात आले होते व पोलीस प्रशासनाने चौक बंदोबस्त केला होता. यावेळी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट दिली.





Social Plugin